देशात पहिल्यांदाच झाली रोबोटीक शस्त्रक्रिया, महिलेच्या गळ्यातून 8 सेमीचा ट्युमर काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात पहिल्यांदाच रोबोटीक शस्त्रक्रियेद्वारे ट्युमर काढण्यास डॉक्टरांना यश मिळाले आहे. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात 49 वर्षीय एका महिलेच्या गळ्यावर खूण न ठेवता शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या महिलेच्या गळ्यातून रोबोटीक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून 8 सेमी आकाराचा ट्युमर काढण्यात आला आहे.

अपोलो रूग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात गळ्यातून ट्युमर काढण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया अपोलो रूग्णालयात रोबोटीक ईएनटी हेड अॅण्ड नेक ऑन्कोलॉजीच्या क्लिनिकल लीड डॉ. वेंकट कार्तिकेयन यांच्याकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत अशाप्रकारची ही 125 वी ही शस्त्रक्रिया केल्या आहेत. ही शस्त्रक्रिया यशस्वी करणारे डॉ. वेंकट कार्तिकेयन यांनी सांगितले की, विजयलक्ष्मी नावाची महिला अपोलो रूग्णालयात आली होती. तिच्या गळ्याच्या डाव्या बाजुला ट्युमर होता. ही देशातील पहिली RAHI पद्धतीची रोबोटीक शस्त्रक्रिया आहे. पुढे सांगितले की, महिलेच्या लाळ ग्रंथीवर 8च्या आकारातील ट्युमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र या शस्त्रक्रियेत महिलेला कुठेही चीर वगैरे दिलेली नाही.

डॉ.कार्तिकेयन यांनी सांगितले की, रोबोटिक डोकं आणि मानेची शस्त्रक्रिया ही ईएनटीचे वैशिष्ट्य आहे. हे घशाच्या कर्करोगासाठी ट्रान्स ओरल रोबोटिक सर्जरी (TORS) म्हणून वर्गीकृत आहे. त्याच बरोबर मानेवर कोणतेही व्रण न ठेवता गाठ काढून टाकण्यासाठी रेट्रोऑरिक्युलर हेअरलाइन इंसिजन (RAHI) ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यांनी सांगितले की, या प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे मानेवर खूण राहत नाही. हे उत्तम कॉस्मेसिस आणि उच्च प्रमाणात एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यास अनुमती देते. रोबोटीक शस्त्रक्रिया ही तरुणांसाठी योग्य उपचार पद्धती मानली जाते. खरंतर, सामान्य शस्त्रक्रियेचे व्रण राहतात आणि ते दिसून येतात. मात्र रोबोटीक शस्त्रक्रियेत हेअरलाइन इंसीजन लावले जातात. जे सहसा दिसत नाही. ही ट्रीटमेण्ट डोकं आणि गळ्याच्या कर्करोग रूग्णांसाठी एक वरदान आहे. याच्या माध्यमातून थायरॉईड, पॅराथायरॉईड ग्रंथी, पॅराफेरीन्जियल स्पेस ट्युमर, लाळ ग्रंथी काढण्यासाठी अगदी सहज या शस्त्रक्रिया केल्या जातात.