बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील अमरेली येथे आज बिबट्याच्या हल्ल्यात एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. मुलगा आपल्या कुटुंबीयांसोबत झोपला होता. बिबट्याने कुटुंबीयांचा डोळा चुकवून त्याला जवळच्या झुडपात नेले. कुटुंबीयांनी आरडाओरड करतात बिबटय़ाने मुलाला तेथे टाकून पळ काढला. मुलाच्या मानेला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. या आधी बिबटय़ाच्या हल्ल्यात तीन वर्षीच्या चिमुकलीचा तर एका पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता.