
रवींद्र नाटय़मंदिरात 20 आणि 21 डिसेंबरला नाटकांची पर्वणी
रविकिरण संस्था गेली 65 वर्षे सामाजिक, नाटय़, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. रविकिरण मंडळ गेली अनेक वर्षे आंतरशालेय नाटय़ स्पर्धा आयोजित करत आहे. मंडळाची 36वी बालनाटय़ स्पर्धा ज्योतिराम कदम सरांच्या स्मरणार्थ होणार आहे. स्पर्धा 20 आणि 21 डिसेंबर रोजी रविंद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान पार पडेल. 21 डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
स्पर्धेत सादर होणारी बालनाटय़ं
20 डिसेंबर
शिकार (श्री आवाज संस्कृती फाऊंडेशन, ठाणे), जय हो फँटसी (जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी), ध्येयधुंद (रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली), व्हाय नॉट रामायण (स्वामी विवेकानंद विद्या. अरुणोदय माध्य. डोंबिवली पश्चिम), विळखा (आरंभ क्रिएशन कळवा), आदिंबाच्या बेटावर (अश्वमेध नाटय़संस्था कल्याण), दंगल (गुरुकुल-द डे स्कूल बदलापूर), योद्धा (संदेश विद्यालय, विक्रोळी), झेप (कलासंस्कृती व कलावेधक संस्था कल्याण), अरे माणसा माणसा (उत्कर्ष मंदिर मालाड), दप्तर (सृजन प्रतिष्ठान – वाशिंद)
21 डिसेंबर
झटकून टाकू आळस (ग्लोबल अॅक@डमी ठाणे), अदृश्य (सेक्रेड हार्ट स्कूल वरप कल्याण, हमजा हाजिर हो (विलेपार्ले महिला संघ- विलेपार्ले पूर्व), नापास (आकांशा बालरंगभूमी पुणे), पट्टेरी (सिटी प्राईड स्कूल-मोशी पुणे), मैं ऐसा क्यू हूं (पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले), कणाचा मण (शिरोडकर हायस्कूल परळ)




























































