चिली हवाईदलाचे मालवाहू विमान बेपत्ता

729

चिली हवाईदलाचे मालवाहू विमान ‘C-130 हरक्युलस’ मंगळवारी सकाळी बेपत्ता झाले आहे. अंटार्क्टीका वरून जात असताना या विमानाचा नियंत्रण कक्षाशी अचानक संपर्क तुटला. या विमानात 38 प्रवासी होते. चिली हवाईदलाने त्यांचे मालवाहू विमान बेपत्ता झाल्याचे वृत्त दिले आहे. या विमानाला शोधण्यासाठी विशेष रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात य़ेत आहे.

हे विमान सोमवारी संध्याकाळी 4.55 मिनिटांनी दक्षिण चिलीमधील पुंता एरिनास येथून रवाना झाले होते. पण विमान 6.13 वाजता अंटार्क्टीका वरून जात असताना अचानक बेपत्ता झाले. त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. दरम्यान, चिली हवाईदलाने दिलेल्या माहितीनुसार या मालवाहू विमानात 38 जण प्रवास करत होते. त्यात 17 जण क्रू मेंबर असून 21 प्रवासी आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार विमान अंटार्क्टीकावर असलेल्या चिली हवाईदलाच्या तळावर जात होते. विमान बेपत्ता होण्याची ही पहिलीच घटना नसून याआधीही मलेशिया आणि इंडोनेशियाचे प्रवासी विमान रडारवरून अचानक बेपत्ता झाले होते.

यावर्षी हिंदुस्थानी हवाईदलाचे  विमान A-32  रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. जून महिन्यात आसाममधील जोरहाट या हवाईदलाच्या तळावरुन उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. या विमानात 13 जण होते.

आपली प्रतिक्रिया द्या