Citizenship Amendment Bill Live – विधेयक मांडण्यासाठी 293 मतं पडली, अमित शहांनी विधेयक मांडले

1658
amit-shah

 

 • काँग्रेसनेच जिन्नांचा द्विराष्ट्रवाद स्वीकारला
 • विधेयकामुळे कोणताही जाती-धर्माचा भेदभाव होणार नाही
 • पाकिस्तानात आजही 3.4 टक्के हिंदू, अल्पसंख्याकांवरील अन्याय सहन करणार नाही
 • विधेयकामुळे कलम 14 चे उल्लंघन होत नाही- अमित शहा
 • नागालँड, मिझारमच्या खासदारांकडून विधेयकाचे समर्थन
 • विधेयकात सुधारणेची गरज असल्याचे सांगत गौरव गोगोई यांचा विरोध
 • शिरोमणि अकाली दलाकडून विधेयकाचे समर्थन
 • आपली मते मांडल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी विधेयकाची प्रत फाडली
 • अफगाणिस्तानसोबत श्रीलंकेच्या विस्थापितांचाही विचार करण्यात यावा
 • कश्मीरी पंडितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळायला हवे
 • कायदा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करा
 • शरणार्थिंमुळे देशातील भूमिपुत्रांवर अन्याय होणार याची तरतूद करण्याची गरज
 • विधेयकात सुधारणेची गरज असल्याचे विनायक राऊत यांचे मत
 • विस्थापितांचे पूनर्वसन कोणत्या राज्यात करणार, राऊत यांचा सवाल
 • घुसखोरांना देशाबाहेर काढणे सरकारचे कर्तव्य – शिवसेनेच्या विनायक राऊत यांची भूमिका
 • विकासाचे युग आले आहे- भाजप खासदार राजेंद्र अग्रवाल
 • भाजपचा देशाबाबतचा विचार विभाजन करणारा – अभिषेक बॅनर्जी
 • विधेयकात काही विरोधाभास असल्याने, याचा फेरविचार करण्यात यावा
 • शरणार्थिंचा धर्म न बघता त्यांना शरण देणे आपले कर्तव्य आहे
 • विधेयकामुळे संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे
 • हे विधेयक हिंदुस्थानी परंपरा आणि संविधानाच्या विरोधात आहे -मनीष तिवारी
 • लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चेला सुरुवात


  • अधीरंजन चौधरींचा भाजपवर हल्लाबोल, अल्पसंख्याकांच्याविरोधात विधेयक असल्याचा आरोप

 • चर्चा होईल पण विधेयक मांडल्यावर – अमित शहा
 • विधेयक मांडल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, मात्र बहिष्कार टाकून वॉकआऊट करू नका – अमित शहा
 • हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही – अमित शहा
 • अमित शहा विधेयक मांडण्यासाठी उभे राहिले
 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत उपस्थित
 • समाजवादी पक्ष नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाचा विरोध करणार – अखिलेश यादव

 • आसाममधील आदिवासी विद्यार्थ्यांनी देखील विरोध केला
 • आसाममधील 16 संघटनांनी या विधेयका विरोधात 12 तासांचा बंद पुकारला आहे
 • बंगळुरूमधील IIM च्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांचं खासदारांना पत्र

संसदेत नागरिकत्व (सुधारणा) विधेयक येण्याआधीच बंगळुरूमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी संसदेला एक पत्र लिहिले आहे. या पत्रातू संसदेच्या खासदारांना अपील करण्यात आले आहे की, या विधेयकाला विरोध करा. असे केल्यास येणाऱ्या पिढ्या खासदारांचे कायम आभार मानेल. हे विधेयक आमच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

 • धर्माच्या आधारावर नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही – नवाब मलिक
 • आसाममधील एनआरसीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकेची झोड उठली, त्याची भरपाई करण्यासाठी हे विधेयक- नवाब मलिक
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली
 • शिवसेना या विधेयका संदर्भात काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष

नागरिकत्व विधेयक आज लोकसभेत, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

 

 • ईशान्येकडील राज्यांच्या केंद्र सरकार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे
 • ईशान्येकडील राज्यांचा विधेयकाला विरोध कायम
 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज Citizenship Amendment Bill नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लोकसभेत मांडणार
आपली प्रतिक्रिया द्या