YouTube वरील ‘बेशरम रंग’ गाणं रोखण्यास कोर्टाचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील एका दिवाणी न्यायालयाने यशराज फिल्म्सला यू/ए सेन्सॉर प्रमाणपत्र न दाखवता यूट्यूबवर पठाण चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि बेशरम रंग गाणे प्रकाशित करण्यास मनाई करण्यास नकार दिला.

श्रीरामपूर कोर्टाने असे निरीक्षण नोंदवले की, ‘याचिकाकर्त्याच्या मागणीला कोणताही पाया (फाउंडेशन) नाही’.

दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पटेल यांनी ‘सामाजिक कार्यकर्त्याने’ दाखल केलेल्या दाव्यात मनाई आदेश नाकारला. यामध्ये YouTube वरील व्हिडीओ आधी CBFC प्रमाण प्रदर्शित करण्याची मागणी केली होती आणि प्रमाणपत्र प्रदर्शित केल्याशिवाय YRF चा कोणताही व्हिडीओ पोस्ट करण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती.

याचिका कर्त्यानं दावा केला की सिनेमॅटोग्राफी कायद्यानुसार, वर्तमानपत्र, होर्डिंग्ज, ट्रेलर आणि टीझर्समध्ये जाहिरात प्रकाशित करण्यापूर्वी U/A प्रमाणपत्र प्रकाशित करणे आवश्यक आहे.

तसेच, TMT लॉ प्रॅक्टिसचे YRF चे वकील हर्ष बुच यांनी युक्तिवाद केला की खटला स्वतःच दिशाभूल करणारा होता. OTT प्लॅटफॉर्मवर जाहिरात प्रकाशित करताना CBFC प्रमाणपत्र दाखवण्याचा कोणताही नियम नव्हता आणि सिनेमॅटोग्राफी कायदा 1953 अंतर्गत प्रमाणपत्राची आवश्यकता चित्रपटाच्या थिएटर स्क्रिनिंग आणि DVD वर मर्यादित होती. यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मचे 2021 च्या माहिती तंत्रज्ञान नियमांद्वारे नियमन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.