Video : राजस्थानमध्ये संघाचे कार्यकर्ते व मुस्लीम तरुण भिडले

12


सामना ऑनलाईन । बुंदी

राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व मुस्लीम तरुण भिडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

बुंदी जिल्ह्यातील एका बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू होती. त्याच दरम्यान तेथे मुस्लीम नागरिकांचा देखील एक कार्यक्रम सुरू होता. अचानक या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले व वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत, असे बुंदीचे तहसीलदार बी.एस. राठोड यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या