
एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरू राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. खासगी कार्यालये, विवाह समारंभ, बाजारपेठा यात नियमांचे पालन होत नाही. अशा परिस्थितीत जनतेच्या अरोग्याचे संरक्षण करणे यालाच आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊन करावे लागेल हे निश्चित; तेव्हा राज्यात धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱया वाढीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना टास्क फोर्सची विशेष बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लादण्याचे आदेश दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनी या चर्चेत महत्त्वाचे मुद्दे मांडले.
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाटयाने होणाऱया वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱया पडू लागल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.
वेळीच चाचणी न केल्याचे परिणाम
विशेषतः संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले.
केवळ मुंबई, पुण्यावर लक्ष नको!
लोकांना कोरोनापेक्षादेखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाहीत अशी भीती आहे, ती त्वरित काढणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळेल अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही याकडे लक्ष द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येईल
राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळेच इतर पर्यायांचा विचार व्हायला हवा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
लॉकडाऊनसाठी नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले म्हणजे लॉकडाऊन अपरिहार्य आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकते असे मलिक म्हणाले.
कोरोनामुळे तरुणवर्गातही मृत्यूचे प्रमाण वाढू शकते -आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपका&चा शोध अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी 10 ते 18 वयोगटातदेखील मोठया प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्येदेखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा
व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन 80 टक्के वैद्यकीय व 20 टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत 80- 20 प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
ई आयसीयूचा मोठया प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पावले उचलावीत असेही आदेश मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
अर्थचक्र प्रभावित होणार नाही- मुख्य सचिव
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ज्याठिकाणी संसर्ग वाढ जास्त आहे तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये व समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सूचना प्रशासनास देण्यात येत आहेत तसेच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही. त्याचे संतुलन ठेवण्यात येईल, अशी ग्वाही मुख्य सचिव सीताराम पुंटे यांनी यावेळी दिली.
लॉकडाऊन मर्यादित दिवसांसाठी
मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती (एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल. गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर द्यावा, प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी, वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत, सहव्याधी असलेल्या कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे, अशा महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या.
कोविड अपडेट
सोमवारची रुग्णसंख्या
राज्य
रुग्ण 31643
मृत्यू 102
मुंबई
रुग्ण 5890
मृत्यू 12
ठाणे – 1010
नाशिक – 1892
पुणे – 2554
संभाजीनगर – 803
नागपूर – 2281
नगर – 825
नांदेड – 678
नवी मुंबई – 598






























































