
विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे. यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून त्यांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनीही टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


























































