विमानतळावरून 69 कोटींचे कोकेन जप्त 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूल गुप्तचर संचालनालया (डीआरआय)ने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 6.90 किलो कोकेन जप्त केले आहे. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 69 कोटी रुपये आहे. याप्रकरणी डीआरआयने आर्ट्स झिनबर्ग्स या प्रवाशाला अटक केली. आर्ट्सला न्यायालयाने 21 जूनपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकजण कोकेन घेऊन येणार असल्याची माहिती ‘डीआरआय’ला मिळाली. त्या माहितीनंतर ‘डीआरआय’ने विमानतळावर सापळा रचला. आर्ट्स हा विमानतळावर आला असता त्याला ‘डीआरआय’च्या अधिकाऱयाने ताब्यात घेतले व त्याच्या बॅगेची तपासणी केली. बॅगेत महिलांच्या चपला, किसोबोरचे पाच पुठ्ठे आढळले. किसोबोरच्या पाकिटामध्ये कोकेन लपवले होते. आर्ट्स हा मूळचा रिपब्लिक देशाचा नागरिक आहे. सो पॉलो व्हाया दोहा येथून तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता.