व्यंगचित्र प्रदर्शनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देशभरातील नामवंत चित्रकार आणि व्यंगचित्रकारांनी आपापल्या चित्रशैलीतून रेखाटलेल्या व्यंगचित्रे आणि अर्कचित्रे असलेल्या ‘आमचेही फटकारे’ या प्रदर्शनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप आणि कार्टुन्स कट्टा यांच्या वतीने यांचे संयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत शुक्रवार, 18 नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे. बाळासाहेबांवरील या व्यंगचित्र प्रदर्शनाला रसिकांची भरभरून दाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सभागृहात हे प्रदर्शन सुरू आहे.