
वरळी येथील वांद्रे-वरळी सी-लिंकवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एकूण 4 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला त्यांचा अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.
वांद्रे-वरळी सी-लिंकवर नुकत्याच झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले होते. या अपघाताची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून त्यानुसार या मार्गावर अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीचे अध्यक्ष पद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे असणार आहे. त्याव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम), सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव (सेवा) यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, 5 ऑक्टोबर रोजी सी-लिंकवर झालेल्या अपघाताची चौकशीही करण्याची सूचना या वेळी करण्यात आली आहे.


























































