संगणक अभियंता तरुणीला गोळ्या घालण्याची धमकी

25
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । पिंपरी

हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या कारणावरून तिला रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी संगणक अभियंता तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जितेंद्र सोळंकी तत्कालीन (रा. शोनेस्ट टॉवर सोसायटी, वाकड. मूळगाव जोधपूर, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 ते 10 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये घडली.

फिर्यादी तरुणी व आरोपी जितेंद्र हे दोघे पूर्वी हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीमध्ये काम करीत होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख होती. आरोपी जितेंद्र यांनी ‘तू माझ्याशी रिलेशन ठेव. माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणत तरुणीची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपीने रिव्हॉल्वरने गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचा पाठलाग करीत तिच्या मोबाइलवर, व्हॉट्सअॅपवर फोन करून सबंध ठेवण्यासाठी दमदाटी केली. या प्रकाराला कंटाळून तरुणीने अखेर पोलिसात धाव घेतली.

summary- computer engineer youth threaten to kill by a gun

आपली प्रतिक्रिया द्या