
मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी आपल्या उद्योजक मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज सहज माफ करतात असेही काँग्रेसने म्हटले आहे.
मोदी सरकार ने गरीब जनता से 5 साल में 8,500 करोड़ रुपए वसूल लिए।
कारण- बैंक खातों में मिनिमम बैलेंस न रख पाना।
नरेंद्र मोदी अपने अमीर दोस्तों के लाखों-करोड़ों का कर्ज यूं ही माफ कर देते हैं, लेकिन गरीबों पर जुर्माने का चाबुक चलाना नहीं भूलते।
जनता को महंगाई, बेरोजगारी और…
— Congress (@INCIndia) July 30, 2024
काँग्रेसने एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट लिहून म्हटले आहे की मोदी सरकारने गरीब जनतेकडून 5 वर्षात 8 हजार 500 कोटी रुपये वसूल केले आहेत. बँकेत मिनिमम बॅलेन्सच्या नावाने हे पैसे सरकारने घेतल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या श्रीमंत मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज लगेच माफ करतात, पण गरीबांवर दंडाचा चाबूक उगारायला विसरत नाही. जनतेला महागाई, बेरोजगारी आणि वसूलीच्या चक्रव्युहात अडकवणाऱ्या मोदी सरकारला याचे जोरदार प्रत्युत्तर मिळेल. देशाची जनता मोदी सरकारचा हा चक्रव्युह नष्ट करेल असेही काँग्रेसने म्हटले आहे.