शिवसेना-भाजप युतीच्या मेळाव्यात कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची उपस्थिती

58

सामना ऑनलाईन । नगर 

शिवसेना-भाजप युतीच्या मेळाव्यात रविवारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी उपस्थित राहून या ठिकाणी सुजय विखे यांना निवडून देण्याचे आवाहन केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरमध्ये सुरू असताना काँग्रेसचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी या बैठकीला हजेरी लावली. तसेच भाषण करून सुजय विखे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. श्रीगोंदा तालुक्यात त्यांना जास्तीत जास्त मताधिक्‍य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे शिवसेना- भाजपच्या मेळाव्यात त्यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सहभागी होऊन भाषण केले. याबाबत आता काँग्रेस आता काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या