काँग्रेसच्या बंडखोर आमदाराच्या मुलीची सासरी आत्महत्या

847

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांपैकी एक असलेले सुरेश धाकड यांच्या मुलीने सासरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ज्योती असे धाकड यांच्या मुलीचे नाव होते व तिचे सासर राजस्थानमधील बारन जिल्ह्यात आहे. ज्योतीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप काहीही समजले नसून हा घातपात आहे का याचाही तपास केला जाणार आहे.

पोखरी मतदारसंघाचे आमदार असलेल्या सुरेश धाकड यांच्यासह 22 काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर हे सर्व आमदार बंगळुरूतील हॉटेल रमाडा येथे राहत होते. हे आमदार त्यानंतर कुणाशीही संपर्कात नव्हते. या दरम्यानच सुरेश धाकड यांच्या मुलीने तिच्या सासरी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ज्योतीचा विवाह बारन जिल्ह्यातील ड़ॉ. जय सिंह मेहता यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वी झाला होता. ज्योतीच्या पश्चात तिचा पतील व दोन वर्षांची मुलगी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या