मी अयोध्येत गेलो असतो तर त्यांना चालले असते का?

भाजपा सरकारने राष्ठपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राममंदिराच्या उद्घाटनला आमंत्रित न करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. राजकीय मर्यादांमुळे किंवा मजबुरीमुळे आम्हाला श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ात सहभागी होता आले नाही. जर मी अयोध्येला गेलो असतो तर भाजपला चालले असते का, असा सवाल खरगे यांनी केला.

आजही देशातील अनेक मंदिरांत अनुसूचित जातीच्या लोकांना प्रवेश दिला जात नाही, याकडेही खरगे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, मोदींच्या 400 पारच्या घोषणेबद्दल पत्रकारांनी विचारले असता त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण लोकांना बदल हवा आहे. भाजपाचे नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, असा आरोप खरगे यांनी केला.