काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व युवा उपजिल्हाप्रमुख अविनाश कोतकर यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी जिल्हा युवा सेना उपप्रमुख अविनाश कोतकर, तालुकाप्रमुख संजय काशिद, संतोष मोहळकर, युवासेना तालुका प्रमुख पप्पू साळुंके, संदिप भोरे, शहरप्रमुख सुरज काळे, विभाग प्रमुख मंगेश वारे, खंडू कवादे, दादासाहेब दळवी, बब्रुवान वाळुंजकर, मोहन जाधव, जगदीश भाकरे, करण ओझर्डे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यामध्ये बोलताना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी प्रत्येक शिवसैनिकांनी व युवासैनिकांनी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे व पर्यावरण संतुलनासाठी आपले योगदान द्यावे हीच खरी आपली समाजसेवा ठरेल असे मत व्यक्त केले. तसेच शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणावर शिवसेनेची वाटचाल जोमाने सुरू आहे. आज घराघरात गावागावात शिवसेनेची शाखा स्थापन होत आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शंभर प्लस आकडा गाठणार आहे असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला.