३५ रुपयाने इज्जत घालवली, काँग्रेसला कार्यालय खाली करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,

अलाहबादच्या काँग्रेसच्या कार्यालयाचे भाडे थकल्याने ते बंद करण्याची नोटिस कार्यकर्त्यांना मिळाली आहे. १९३२ साली या कार्यालयाची स्थापना झाली होती. अलाहबादच्या शहर समितीचे हे कार्यालय असून त्याचे भाडे थकवल्याने मालकाने ते खाली करण्याची नोटिस दिली आहे. या कार्यालयाचे भाडे हे फ़क्त ३५ रुपये महिना आहे. ते ही कार्यकर्त्यांनी वेळेत न भरल्याने ही रक्कम ५० हजारांच्या घरात गेली आहे. अलाहबादच्या ३४ जवाहर स्क्वेअर या भागात शहर काँग्रेस समितीचे कार्यालय आहे.

शहर काँग्रेस समितीचे अध्यक्षपद माजी पंतप्रधान नेहरू, त्यांच्या पत्नी कमला नेहरू तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आदि मान्यवरांनी भुषवले आहे. स्वातंत्र्यपुर्व काळापासून हे कार्यालय कार्यरत आहे. तसेच हे कार्यालय साधेसुधे नसून स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक घडामोडींचे साक्षीदार आहे. अनेक वर्षापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जागेचे मालक राजकुमार सारस्वत यांना भाडे न दिल्याने त्यांनी हे कार्यालय खाली करण्याची नोटिस दिली आहे. सध्याचे शहर समितीचे अध्यक्ष अभय अवस्थी बाबा यांनी राज्याच्या काँग्रेस समितीचे अध्यक्ष राज बब्बर आणि पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांना याप्रकरणी मदत करण्याचे आवाहन केले आहे.