मोदी सरकारचा कर दहशतवाद, 65 कोटी काढल्यावरून काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपाने विरोधी पक्षांविरोधात कर दहशतवादी धोरण अवलंबले असून काँग्रेसच्या विविध खात्यांमधील 65 कोटी अक्षरशः लुटले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने काँग्रेसला आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करण्यासाठी ही कारवाई केली असून ते लोकशाहीची हत्या करून देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने आज गुरुवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल, कोषाध्यक्ष अजय माकन आणि काँग्रेसचे महासचिव आणि समन्वयक जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या दिल्ली येथील मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारवाईवर प्रचंड संताप व्यक्त केला. मोदी हे काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे आणि शेतकऱयांच्या आंदोलनामुळे तसेच महागाई वाढल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते काँग्रेसविरोधात कारवाया करत आहेत असे जयराम रमेश म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सामना करणे अशक्य आहे. त्यामुळेच काँग्रेसला आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी केला. दरम्यान, सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाच्या माध्यामातून तब्बल 30 पंपन्यांनी भाजपाला देणग्या दिल्याचा गौप्यस्पह्ट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.