
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड प्रकल्प गोरेगाव येथील आरे येथेच होणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईचे फुप्फुस असलेल्या आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाला मुंबई काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बिरसा मुंडा चौक, पिकनिक स्पॉट, आरे कॉलनी येथे ‘मुंबई बचाव, आरे मेट्रो कारशेड हटाव’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.






























































