संविधान नाटय़ महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थिएटर ऑफ रेलेवंसचे दोन दिवसीय ‘संविधान नाटय़ महोत्सव’ 24 आणि 25 डिसेंबर रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह, भायखळा येथे होणार आहे.

24 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता ‘राजगती’ नाटक सादर होईल. ‘राजगती’ हे नाटक राजकीय परिस्थिती बदलण्याचे सूत्र आहे. 25 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता ‘गोधडी’ नाटक सादर होईल. ‘गोधडी’ हे नाटक सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्धचे बंड आहे. सांस्कृतिक शोषण, अस्पृश्यता, भाग्य आणि देव यांच्या चक्रात पिसलेल्या विचारांतून मुक्त होण्याची गरज आहे. ‘गोधडी’ हे नाटक आपल्या मूळ संस्कृतीचा शोध आहे.

कला माणसातील माणुसकी जागवते. नाटक माणसाच्या वैचारिक क्षमतेला अंतर्दृष्टी देऊन विवेक जागवते. या दोन दिवसीय संविधान नाटय़ महोत्सवाला आपल्या सर्जनशील सहभागाने प्रज्वलित करू या आणि आपल्यात मानवतेची ज्योत प्रज्वलित करू या व संविधान संमत देश घडवू या, असे आवाहन या महोत्सवाच्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवंसने केले आहे.