बद्रीनाथाची आरती मुसलमानाने लिहिली?

badrinath-1

सामना ऑनलाईन । बद्रीनाथ

उत्तराखंडमधील बद्रीनाथ हे चार धामांपैकी एक आहे. पवन मंद सुगंध शीतल या आरतीशिवाय मंदिरातील पूजा कधीच पूर्ण होत नाही. आता या आरतीच्या लेखकावरून उत्तराखंडमध्ये एक नवा वाद निर्माण झाला आहे.

100 वर्षापूर्वी लिहिलेल्या या आरतीचे लेखक धान सिंह बर्थवाल आहे असे झारखंडच्या भाजप सरकारने जाहीर केले आहे. तर या आरतीचे लेखक पोस्टमास्तर फखरुद्दीन सिद्द्की आहेत असा दावा अनेकजण करत आहेत.

धानसिंह यांचे पणतू महेंद्र सिंह बर्थवाल यांनी शासनाकडे आरतीचे हस्तिलिखित दिले आहे. तसेच कार्बन डेटिंग चाचणीनंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी जाहीर केले की, हे हस्तलिखित 1881सालचे आहे आणि तेव्हापासून ही आरती लोकप्रिय झाली. बदरुद्दीन यांच्या कुटुंबीयांनी असा कुठलाच पुरावा सादर न केल्याने सरकारने आरतीचे लेखक म्हणून महेंद्र सिंह यांचे नाव जाहीर केले.

1889 साली एक पुस्तक प्रकाशित झाले होते त्यात ही आरती होती. बदरुद्दीनचे नातेवाईक या पुस्तकांचे संरक्षक होत असे म्हटले जाते. हे पुस्तक अल्मोडाच्या एका संग्रहालयात ठेवली आहे. या पुस्तकाचे मालक किशोर पेठशाली म्हणाले की, हे पुस्तक हिंदु धर्माचे स्कंद पुराणाचे भाषांतर असून अल मुश्तहर मुंशी नसीरुद्दीन हे त्याचे संरक्षक होते, तसेच या पुस्तकाच्या शेवटी ही आरती लिहिली गेली आहे.

काही तज्ज्ञांनी सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कार्बन डेटिंग चाचणीनुसार पुस्तकाचे नेमके वर्ष कळत नाही असा तज्ज्ञांचा दावा आहे. तर दुसरीकडे ज्यांनी ही कार्बन डेटींग चाचणी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या चाचणीतून नेमके वर्षं कळतं.