जाद्च्या प्रयोगातून कोरोना जनजागृती ; जादूगार सम्राट शंकर यांचा पुढाकार

नागरिकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी प्रसिद्ध जादूगार सम्राट शंकर पुढे आले आहेत. आपल्या जादूच्या कलेतून ते साबण, सॅनिटायझर, मास्क तयार करून दाखवणार आहेत. या वस्तूंचा नियमित वापर करा, तसेच लसीचे दोन डोस घ्या, असे आवाहन करणार आहेत.

जादूगार शंकर सम्राट यांनी गेली 45 वर्षे देशविदेशात 30 हजारांहून अधिक जादूचे प्रयोग केले आहेत. कोरोना जनजागृतीसाठी सम्राट यांनी दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांची निवड केली आहे.  जादूचे प्रयोग ते मोफत करणार आहेत. मी जादूच्या कलेने हत्ती, कार असे काहीही गायब करू शकतो. पण कोरोनाला गायब करायचे असेल तर कोरोना नियमावलींचे कडक पालन करणे आवश्यक आहे, असा संदेश ते देणार आहेत.