
वेस्ट इंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेतला सज्ज झालेल्या टीम इंडियातील शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांत सपोर्ट स्टाफमधील पाच जणांचाही समावेश आहे. यजमान संघावरील या कोरोना अटॅकमुळे हिंदुस्थान -वेस्ट इंडिज क्रिकेट मालिकेवर अनिश्चिततेचे सावट घोंगावताना दिसत आहे. या संकटामुळे हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील क्रिकेट मालिका रद्द होणार का, हा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडला आहे.
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारीला सुरु होणार आहे, त्यामुळे आता फक्त चार दिवसांवर पहिला सामना येऊन ठेपला आहे. त्यामुळे एवढया कमी कालावधीमध्ये हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेचे भवितव्य बीसीसीआयच्या हातामध्ये असेल. बीसीसीआयचे अधिकारी यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि अन्य खेळाडूंबरोबर चर्चा करतील. जर संघामध्ये या कोरोनाच्या प्रवेशामुळे भितीचे वातावरण असेल तर ही वनडे मालिका रद्द केली जाऊ शकते. इंग्लंडमधील कसोटी मालिकेच्यावेळी देखील असेच घडले होते. चौथ्या कसोटीनंतर हिंदुस्थानी संघात कोरोनाचा प्रसार झाला होता आणि त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू धास्तावले होते. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंशी चर्चा करून पाचवा कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
वेस्ट इंडीजचा संघ अहमदाबादमध्ये
घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत बलाढय़ इंग्लंडला नमकून आत्मकिश्कास उंचाकलेला कायरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील केस्ट इंडीज संघ बुधवारी सकाळी अहमदाबादमध्ये दाखल झाला. 6 फेब्रुकारीपासून हिंदुस्थान-विंडीजदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तीन कन डे सामन्यांची मालिका रंगणार आहे. कन डे मालिकेनंतर केस्ट इंडीजचा संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमकर हिंदुस्थानविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ‘बार्बाडोसकरून दोन दिकसांचा प्रकास करून केस्ट इंडीजचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला,’ असे केस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्किटमध्ये म्हटले आहे. हिंदुस्थान दौऱयाकर आलेले केस्ट इंडीज संघातील बहुतेक खेळाडू पुढच्या महिन्यात सुरू होणाऱया आयपीएलच्या 15 क्या हंगामामध्ये खेळताना दिसतील. केस्ट इंडीजचा कर्णधार कायरॉन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. केस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंच्या आगमनाचा क्हिडीओदेखील पोस्ट केला आहे.
आता निर्णय हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या कोरोना अहवालावर अवलंबून
पण जर खेळाडूंना भिती वाटत नसेल तर बीसीसीआय ही मालिका खेळवण्याचा निर्णय घेईल. सध्याच्या घडीला तरी हिंदुस्थानी संघातील तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे आणि त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या तिघांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तातडीने पुन्हा करोना चाचणी करण्यात येऊ शकते आणि ते जर पॉझिटीव्ह नसतील तरच त्यांना संघात प्रवेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे या तिघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कोरोना अहवाल कसे येतात, हे पाहिल्यावर बीसीसीआय पुढचा निर्णय घेऊ शकते. कारण या तिघांच्या संपर्कात काही खेळाडू आले असतील आणि ते जर कोरोना पॉझिटीव्ह सापडले तरी तो टीम इंडियाला मोठा धक्का असू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन बीसीसीआय निर्णय घेईल. पण सध्याच्या घडीला तरी वनडे मालिका रद्द करण्याचा विचार बीसीसीआय करू शकणार नाही, असे चित्र आहे.




























































