हिंदुस्थानात हिवाळ्यात कोरोनाची साथ पुन्हा पसरणार, जागतिक आरोग्य संघटनेची भिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानात उन्हाळ्यात कोरोनाचे सावट कमी असणार आहे. परंतु हिवाळ्यात ही साथ परत येईल अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणू हा साथीचा आजार आहे. गर्दीत तो जास्त फोफावतो. खोकल्यामुळे, शिंकल्यामुळेही तो जास्त फैलावतो. उन्हाळ्यात हा विषाणू फार तग धरू शकत नाही. एप्रिल आणि मे महिन्यात हिंदुस्थानमध्ये तापमान जास्त असते त्यामुळे या विषाणूचा प्रादूर्भावाला आळा बसू शकतो. पण फक्त तापमानामुळेच नव्हे तर लोकांनी जर एकत्र जमणे बंद केल्यासही या विषाणूला आळा बसू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

असे असले तरी हिवाळ्यात हा विषाणू परत येऊ शकतो अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उन्हाळ्यात हा विषाणू नष्ट होणार नाही. सध्या तरी आपण रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच हिंदुस्थानातील तापमान पाहता इतक्यात काही सांगणे कठीण आहे असेही त्यांनी सांगितले.

2009 साली स्वाईन फ्लू सारखा आजार बळवला होता. H1N1 नावा विषाणू सगळीकडे पसरला होता. तो विषाणू आजही अस्तित्वात आहे. या उन्हाळ्यात या विषाणूचे काय होते हे पाहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच उन्हाळ्यात कोरोना विषाणू नामशेष होतो ही शक्यता नाकारता येत नाही, म्हणून हिवाळ्यात या विषाणूचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे असेही काही तज्ज्ञांनी नमूद केले.