त्या दोन कोरोना पेशंट्सने  नगर शहरात येऊन केला जिल्ह्यातील ह्या भागात प्रवास

2142
फोटो- प्रातिनिधीक

नगर जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुण्याच्या एनआयव्हीने दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. या व्यक्तीसोबत असणार्‍या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताहून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची तपासणी करुन घ्यावी,  तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे. स्वताच्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या व्यक्ती थांबलेल्या परिसराला सील करण्याचे आणि हा परिसर औषध फवारणी करुन  निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

या दोन व्यक्तीसह 14 जणांचा ग्रुप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. त्यानंतर हा ग्रुप 2 आठवडे दिल्ली येथे थांबला. या कालावधीत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासही केला. विविध ठिकाणांना भेटी दिल्या. दिनांक 14 मार्च रोजी रेल्वेने हे सर्वजण नगर येथे आले. ते शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसर्‍या दिवशी ते जामखेडला रवाना झाले तेथे ते 26 मार्चपर्यंत होते

आपली प्रतिक्रिया द्या