पुणे – कोरोना रूग्णांना जेवणात 2 अंडी, शेंगदाणा लाडू मिळणार

पिंपरी- महापालिका रूग्णालय,कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना अधिकचा सकस आहार मिळणार आहे.चपाची,भात,भाजी यांच्या प्रमाणात वाढ करण्याबरोबरच दोन अंडी आणि शेंगदाणा लाडूही जेवणात देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यावर प्रतिदिन प्रतिव्यक्ती 230 रूपयांचा खर्च होणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेमार्फत केलेल्या कोविड केअर सेंटर आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर येथील रूग्ण तसेच व्यक्तींना आणि महापालिका तसेच शासनाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गरजेनुसार जेवण आणि नाष्टा उपलब्ध करून दिला जातो.त्याकरीता सध्याचा दर 180 प्रतिदिन/प्रतिव्यक्ती असा आहे.सध्या दिल्या जाणाऱ्या जेवण आणि नाष्टा यांची क्वांटीटी आणि क्वालिटी अधिक चांगली होणे गरजेचे आहे.तसेच,त्यामध्ये प्रथिनांचा अधिक प्रमाणात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी सध्या दिल्या जाणाऱ्या चपाती,भात,भाजी यांच्या प्रमाणात वाढ केली जाणार आहे.तसेच,दोन अंडी आणि शेंगदाणा लाडू जेवणात देण्यात येणार आहे.त्याकरीता 180 या दरामध्ये 50 रूपये वाढ करावी.प्रतिव्यक्ती/प्रतीदिन 180 ऐवजी 230 रूपये असा दर निश्चित करण्याचा आयत्यावेळी प्रस्ताव स्थायी समितीच्या साप्ताहीक सभेत मंजूर करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या