RBI च्या निर्देशाला खासगी बँकांकडून केराची टोपली, हफ्ते भरण्यासाठीचे मेसेज धाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे देशातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे
गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या इएमआयला तीन महिन्यांची स्थगिती देण्याचे निर्देश रिझर्व बँकेने दिले होते. मात्र या आदेशाला बँकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे.

रिझर्व बँकेच्या आदेशानंतरही कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांकडून कर्जदारांना कर्जाचा हप्ता नियमित तारखेला भरा असे मेसेजेस पाठवले जात आहेत. रिझर्व बँकेच्या निर्देशांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे बँकांकडून कर्जदारांना ठरलेल्या तारखेच्या दिवशी कर्जाचा हप्ता भरण्याचे फर्मान सोडले जात आहे. रिझर्व बँकेने देशातील सर्व बँकांना या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याविषयी स्पष्ट निर्देश द्यावेत अशी अपेक्षा कर्जदार व्यक्त करत आहेत.

img-20200330-wa0005