कोरोनाची टेस्टिंग लॅब मिरजेत लवकरच सुरू होणार

253

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे लवकरच कोरोना तपासणी लॅब सुरू करणार असल्याची घोषणा शासनाने केली होती. मिरज येथील शासकीय रुग्णालय परिसरात सुरू होत असलेल्या कोरोना लॅबच्या कामाची माहिती आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्राववकर यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतली. लॅब सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामुग्री दाखल झाली आहे. लॅबच्या कामाची प्रगती पाहून सदरचा लॅब लवकरच सुरु करत असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली हा लॅब सुरू झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या परिसरातील संशयित रुग्णांच्या सॅम्पल्स तपासणीला गती मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या या संपूर्ण परिसरातील संशयितांचे नमुने पुण्याला पाठवावे लागतात. त्याचे रिपोर्ट यायला किमान दोन दिवस लागताततो पर्यंत संशयितांना अॅडमिट करून घ्यावे लागते. हा लॅब सुरू झाल्यामुळे संशयित म्हणून दाखल केलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी होऊन त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्यांना सोडून देता येणार आहे. मिरज शासकीय रुग्णालयात सध्या कोरोना बाधीत चोवीस रुग्णांवर आयसोलेटेड विभागात उपचार मिळत आहेत याचाही आढावा मंत्री यड्रावकर यांनी घेतला, या विभागात काम करणाऱ्या डॉक्टर्स नर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले,मिरज शासकीय रुग्णालयात 140 बाधित रुग्णांची उपचारासाठीची सोय होण्याची व्यवस्था रुग्णालयाने केली आहे,.

कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण असून येणारा तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने यापुढच्या काळात या संकटाला सामोरे जावे असेही आवाहन त्यांनी उपस्थित डॉक्टर्स अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.यावेळी आरोग्य संचालक हेमंतकुमार बोरसे, सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंखे अधिष्ठाता डॉक्टर नणंदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीगोसावी, डॉक्टर पल्लवी साबळे यांच्यासह डॉक्टर्स अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

आपली प्रतिक्रिया द्या