कोरोनामुळे रोजीरोटी संकटात; जगभरात अडीच कोटी लोक बेरोजगार होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केलेल्या कोरोनाचा रोजगारावर गंभीर परिणाम होणार आहे. या विषाणूच्या फैलावामुळे जगभरात तब्बल अडीच कोटी लोकांच्या नोकऱया जाऊ शकतात, अशी भीती संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्राची संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने आपल्या अहवालाद्वारे ही धोक्याची घंटा वाजवली आहे. 2008 पेक्षा भीषण आर्थिक मंदी असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय समिती स्थापन केल्यास हे संकट कमी होईल, असे संस्थेने म्हटले आहे.

या क्षेत्रांना बसणार फटका

  • सर्वात जास्त नोकऱया देणाऱया रिटेल सेक्टरला कोरोनाच्या फैलावाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. या क्षेत्रातील जवळपास 1 कोटी 10 लाख नोकऱयांवर गंडांतर येऊ शकते.
  • टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये 12 लाख लोक बेरोजगार होऊ शकतात.
  • आधीच मंदीच्या दृष्टचक्रात अडकलेल्या रिअल इस्टेटचेही कोरोनामुळे चांगलेच कंबरडे मोडणार आहे. या क्षेत्रातील 35 टक्के नोकऱया जाणार आहेत.