अमेरिकेत 34 हजार नागरिक कोरोना बाधित; बळीची संख्या 100 च्या पुढे

477
प्रातिनिधीक फोटो

कोरोना व्हायरसमुळे जगातील बलाढ्य राष्ट्रांना मोठ्या ताकदीने सामोरे जावे लागत आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही कोरोनाने ग्रासले आहे. मागील काही दिवसांत अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका दिवसात कोरोनामुळे 117 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत मृतांचा आकडा 419 वर पोहचला आहे.

अमेरिकेत कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर काही उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचाही अपेक्षित परिणाम न साधल्यामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवली. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे चित्र आहे. रविवारपर्यंत तब्बल 9339 नवीन रुग्ण दाखल झाले. ही आतापर्यंतची सर्वांधिक संख्या आहे. अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 33 हजार 546 इतकी झाली आहे. तर 419 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर १७८ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक 15 हजार 790 रुग्ण आढळले असून 114 जणांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनमध्ये 1996 कोरोनाबाधित असून 95 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूजर्सीमध्ये 1914 जणांचा कोरोनाचा संसर्ग झाला असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

कॅलिर्फोनियातही 1755 जणांना कोरोनाची लागण झाली असून 34 जणांचा मृत्यू झाला आहे. मिशिगन, फ्लोरिडा आदी राज्यातही एक हजारहून कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची चाचणी केली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे अमेरिकेत इतर राष्ट्रांतील पर्यंटकांना बंदी घालण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या