
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती वाढू लागली आहे. सामान्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सारेच यापासून सुरक्षित राहण्याचे आवश्यक ते उपाय करताना दिसत आहेत. आता बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी स्वत:हून क्वारंटाइन होण्याच्या निर्णय घेतला आहे. पुढचे काही दिवस ते घरातच बंद राहणार आहेत.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर हाताचा पह्टो शेअर केला. यावर महानगरपालिकेचा शिक्का उमटवलेला दिसत आहे. या शिक्क्यावर स्वतŠहून घरात राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अर्थात ‘क्वारंटाइन’ होण्याबद्दल लिहिले आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत बिग बी त्यांच्या घरातच बंद राहणार आहेत. बिग बी यांनी चाहत्यांनाही यासंदर्भात माहिती दिली आणि स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले.
दरम्यान, बिग बी यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी घरात राहणे पसंत करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पुमार हेदेखील घरात आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली होती. प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांनाही एका हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. जलोटा काही दिवसांपूर्वीत लंडन दौऱयावरून परतले होते. वय जास्त असल्यामुळे त्यांना हॉटेलच्या एका रूममध्ये वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.
































































