
कोरोनाने जीव गमावणाऱ्या एका 98 वर्षांच्या माणसाच्या मृतदेहाचं जाहीर शवविच्छेदन करण्यात आल्याचं वृत्त आहे. गंभीर म्हणजे, हे शवविच्छेदन पाहण्यासाठी लोकांनी तिकीट काढून हजेरी लावली होती.
डेव्हिड सॉन्डर्स लुईसियाना असं या वृद्धाचं नाव असून ते वॉशिंग्टन येथे आपल्या पत्नीसह राहत होते. गेल्या महिन्यात डेव्हिड यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह त्यांच्या पत्नीने मेड अॅड लॅब्स नावाच्या संस्थेला दिला होता. त्यांची संस्था संशोधनासाठी डेव्हिड यांचा मृतदेह वापरणार होती.
पण, संशोधनाऐवजी या संस्थेने एका हॉटेलमध्ये जाहीर शवविच्छेदनाचा कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमाला 500 डॉलर इतकं तिकीटही ठेवण्यात आलं. विशेष म्हणजे हे पोस्टमार्टम पाहण्यासाठी लोकांनीही तिकीट काढून हजेरी लावली होती. जवळपास 70 लोकांसमोर हे शवविच्छेदन पार पडलं.
वास्तविक अशा प्रकारचं जाहीर शवविच्छेदन होण्याची ही पहिली वेळ आहे. या विच्छेदनात मृतदेहाचा अवमान तसंच अवयव तस्करीला प्रोत्साहन मिळू शकलं असतं. सुदैवाने असा कोणताही गुन्हा इथे घडलेला नसल्याने कठोर कारवाई झालेली नाही.
फक्त ते पोस्टमार्टम पाहणाऱ्यांना तो एक मानसिक धक्का असू शकतो. कारण, कोरोनाने गेलेल्या अनेक रुग्णांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांच्या मृतदेहांचं काय झालं असेल, याची पुरेपूर कल्पना हे विच्छेदन पाहणाऱ्या लोकांना आल्याने त्यांना मानसिक धक्का बसलेला असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

























































