हिंदुस्थानी खेळाडूंसाठीबीसीसीआयची क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती

आयपीएल सुरू होण्याआधीपासूनच बायो बबल म्हणजेच सुरक्षीत वातावरणात राहत असलेल्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना आगामी ऑस्ट्रेलियन दौऱयावर त्यांच्यासोबत कुटुंबियांना घेऊन जाता यावे यासाठी बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे विनंती केली आहे.

याप्रसंगी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले, मागील 80 दिवस हिंदुस्थानी खेळाडू बायो बबलमध्ये राहत आहेत. आयपीएल संपल्यानंतर ते थेट ऑस्ट्रेलियन दौऱयावर जाणार आहेत. तिथेही त्यांना 14 दिवसांच्या विलीगीकरणात रहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियातील व्यक्ती त्यांच्या जवळ असायला हवेत. त्यामुळे आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे विनंती केली आहे.

n मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr आणि कोचिंग स्टाफ युएईला पोहोचले

हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr व कोचिंग स्टाफ युएई येथील दुबईमध्ये पोहोचले असून आता ते सुरक्षित वातावरणात राहत आहेत. रवी शास्त्र्ााr यांच्यासोबत फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरण अरुण व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनाही विलीगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. तसेच त्यांना तीन कोरोना चाचणींनाही सामोरे जावे लागले आहे.रवी शास्त्र्ााr यांच्यासह सपोर्ट स्टाफ हिंदुस्थानी खेळाडूंसोबत आयपीएल आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या