डेव्हिड मलानच्या शतकानंतरही इंग्लंड पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरच्याच मैदानावर झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत साखळीतच गारद होण्याचे दुःख पचवत ऑस्ट्रेलिया पुन्हा फॉर्मात आली आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर-ट्रव्हिस हेड यांची 147 धावांची सलामी आणि स्टिव्हन स्मिथच्या नाबाद 80 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 6 विकेट्सनी सहज पराभव केला. या विजयासह यजमानांनी तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. डेव्हिड मलानचे शतक संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले तरी सामनावीराचा मान त्यानेच मिळवला.

पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथमच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय इंग्लंडच्या फायद्याचा ठरला. इंग्लिश सलामीवीर जेसन रॉय आणि फिल सॉल्ट यांनी निराशा केली. या दोघांनीही ऑस्ट्रेलियन वेगवान माऱयाने फार काळ टिकू दिले नाही. फलकावर 20 धावा लागल्या होत्या तेव्हा अवघ्या तीन चेंडूंत हे दोघे माघारी परतले. त्यानंतर इंग्लिश फलंदाजीला एकामागोमाग धक्के बसले, पण डेव्हिड मलान एकटाच लढला. कुणाची त्याला फार साथ लाभली नाही तरी त्याने 54, 40, 41 आणि 60 चार अशा भागीदाऱया करत संघाला 287 धावांपर्यंत नेले.