CWC 2023 – पाकिस्तानचा विक्रमी यशस्वी पाठलाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

37 धावांत इमाम आणि बाबर यांचे विकेट गमावल्यानंतरही अब्दुल्ला शफिक आणि मोहम्मद रिझवान यांनी झळकावलेली वैयक्तिक शतके आणि 176 धावांच्या भागीच्या जोरावर  पाकिस्तानने श्रीलंकेच्या 345 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि 10 चेंडू आणि 6 विकेट राखत वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱया विजयाची नोंद केली. कुसल मेंडिस (122) आणि सदीरा विक्रमासिंघे (108) यांच्या शतकांनी श्रीलंकेला 344 धावांचे आव्हान उभारून दिले होते. 345 धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतरही अब्दुल्ला आणि रिझवान यांनी शतकी खेळय़ा करीत पाकिस्तानला जिगरबाज विजय मिळवून दिला. वन डे क्रिकेटच्या एका सामन्यात चार शतके ठोकण्याची ही तिसरीच वेळ असून वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम पहिल्यांदाच घडला आहे.