
इंग्लंडमध्ये गेल्या कर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली तरच धोनीची टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघात निवड होईल, असे ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीने स्पष्ट केले आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे ‘आयपीएल’चे आयोजन संकटात सापडले आहे. हिंदुस्थानात कोरोना रुग्णांची संख्या काढत असल्याचे लक्षात घेऊन बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, ही स्पर्धा झाली नाही तर महेंद्रसिंग धोनीचे टी-20 वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगणार आहे.
अंधुकशी आशा
कदाचित ‘आयपीएल’ स्पर्धा रद्द झाली तर धोनीला त्याच्या अनुभवाच्या जोरावर जून-जुलैदरम्यान होणाऱया श्रीलंका दौऱयासाठी संधी दिली जाऊ शकते. या दौऱयात प्रत्येकी तीन टी-20 आणि कन डे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर ‘टीम इंडिया’ आशिया कप स्पर्धेत खेळेल. आशिया कप झाल्यानंतर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका होईल आणि त्यानंतर 18 ऑक्टोबर ते 15 नोक्हेंबर या काळात ऑस्ट्रेलियात टी-20 कर्ल्ड कप होईल. ‘आयपीएल’ स्पर्धा रद्द झाली तर टी-20 कर्ल्ड कपच्या आधी होणाऱया श्रीलंका, आशिया कप आणि इंग्लंडविरुद्ध धोनीला संघात स्थान मिळण्याची अंधुकशी आशा आहे. या स्पर्धांमध्ये त्याने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली तर त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठी ‘टीम इंडियात’ वर्णी लागू शकते.


























































