रत्नागिरी बाजारपेठेत तरूणावर प्राणघातक हल्ला, तरुणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक देवाण घेवाणीतून भर बाजारपेठेत तरुणावर कोयत्याने हल्ला करत डोक्यात लादी मारून जीवघेणा हल्ला केल्याची घटना प्रभा हॉटेल येथील गल्लीत घडली. तीन तरुणांनी हा हल्ला केला असून हल्ल्यानंतर दोन तरूण भाजी मार्केट येथून दुचाकीवरून पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागेश प्रकाश गजबर (वय 27 रा. कुवरबाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरातील पऱ्यांची आळी येथे तीन ते चार तरुणांनी एका तरुणाच्या डोक्यात लादी घालून धारदार कोयत्याने त्याच्या डोके, हातावर वार केले. बुधवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी झालेल्या नागेश प्रकाश गजबर (वय 27 रा. कुवरबाव ) या तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याचे झाल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु भर बाजारपेठेत हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे राहणाऱ्या नागेशला काही तरुणांनी फोन करून शहरातील पऱ्याचीआळी येथे बोलावले. तीन ते चार तरुण त्याच्या ओळखीचेच होते, परंतु नागेश पाऱ्याचीआळी येथे आल्यानंतर त्यातील एका तरुणाने त्याच्या डोक्यात लादी घातली. त्यानंतर दुसऱ्या तरुणाने धारदार कोयत्याने नागेशच्या डोक्यावर, हातावर सपासप वार केले. त्यानंतर ते तरुण घटनास्थळावरून पळून गेले. स्थानिक नागरिकांनी नागेशला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेत आलेल्या नागेशवर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते परंतु हल्लेखोर अद्यापही शहर पोलिसांना सापडलेले नाहीत.

हा हल्ला झाला त्यावेळी त्या गल्लीत नागरिकांची ये जा सुरु होती. हल्ला झाल्यानतर परिसरात एकच आरडाओरड सुरु झाला. मात्र त्यातही हल्लेखोर तरुणावर तुटून पडले होते. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सारा प्रकार कैद झाला आहे.