अल्पवयीन मुलीला हॉट बोलून स्पर्श करणे पडले महागात, 50 वर्षीय आरोपीला 3 वर्षांच्या तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका अल्पवयीन मुलीला नको त्या पद्धतीने स्पर्श करणे आणि तिला हॉट बोलणे एका 50 वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. विशेष न्यायालयाने आरोपीचा अन्य कोणता नव्हे तर लैंगिक शोषण करण्याचा हेतू होता. त्यामुळे त्याला दोषी ठरवत न्यायालयाने आरोपीला तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एस.सी. जाधव यांनी 14 डिसेंबर रोजी आरोपींना आयपीसी कलमांखाली मुलीचा पाठलाग करणे, विनयभंग तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदींखाली दोषी ठरवले. हे प्रकरण 24 मे 2016 चे आहे, जेव्हा पीडित मुलगी फक्त 13 वर्षांची होती. न्यायालयाने म्हटले आहे की, पीडित आणि फिर्यादी साक्षीदाराच्या साक्षीनंतर हे सिद्ध झाले आहे की, 24 मे 2016 रोजी पीडिता तिच्या मैत्रिणीसोबत मशिदीजवळ उभी होती, त्यावेळी आरोपीने तिच्या जवळ जात तिला नको त्या ठिकाणी स्पर्श केला. पुढे जात त्याने तिला खूप हॉट दिसत होती,  तिच्या गालावर किस करावासा वाटत होता आणि तिला त्याच्या सोबत घेऊन जाऊ इच्छित होता अशाही कमेण्ट केल्या.

न्यायालयाने सांगितले की, पीडित मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि अश्लील भाषेत बोलणे म्हणजे आरोपीचा अन्य कोणता नव्हे तर लैंगिक शोषण करण्याचा हेतू होता. न्यायालयाने पुढे सांगितले की, आरोपी मुलीचा पाठलाग करायचा आणि तिचे लैंगिक शोषण करायचा.