बॉम्बे’प्रेमी संजय निरूपमांवर ट्विटरवरून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

बॉम्बेचे नाव अधिकृतरित्या मुंबई असं झाल्याला २३ वर्ष उलटून गेली तरी काही काँग्रेस समर्थकांना ते बहुधा बदलल्याचं माहिती नसावं. मुंबई काँग्रेसबद्दलच्या घडामोडींची माहिती देणाऱ्या एका ट्विटर हँडलवर संजय निरूपम आणि त्यांचे साथीदार दक्षिण मुंबईतील हॉटेलात जेवतानाचे फोटो ट्विट करण्यात आलेत. हे ट्विट स्व:त निरूपम यांनी रिट्विट केलं आहे.

या फोटोंसाठीच्या मजकुरात मुंबईऐवजी ‘ बॉम्बे’ लिहल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निरूपमांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असूनही मुंबई शब्दाचा वापर नसलेलं ट्विट रिट्विट केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.   एका ट्विटर वापरणाऱ्याने काँग्रेस आणि निरूपम यांच्यावर टीका करण्यासाठी काय ट्विट केलंय ते पाहा.


तर दुसऱ्या एका ट्विटर वापरणाऱ्याने म्हटलंय की नागपुरात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना काँग्रेस नेते हॉटेलात जेवतायत, हेच आहे यांचं महाराष्ट्रप्रेम