सीएसएमटीच्या पुनर्विकासाच्या निविदा पूर्व बैठकीला 43 कंपन्यांची हजेरी

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील हेरिटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा 1642 कोटी रूपयांतून ‘पीपीपी मॉडेल’द्वारे पुनर्विकास करण्यासाठी आज झालेला निविदा पूर्व बैठकीला तब्बल 43 कंपन्यांनी हजेरी लावली होती. यात अदानी ग्रुप, टाटा प्रोजेक्ट लि. जीएमआर ग्रुप, लार्सन अॅण्ड टुब्रो बडय़ा इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचा समावेश होता.

ज्/ नीती आयोगाचे अध्यक्ष, तसेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ यांच्या उपस्थिती डिजिटल माध्यमातून सीएसएमटी पुर्विकासासाठीची निविदापूर्व बैठक शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीला विकासकांकडून तसेच उद्योग जगताकडून प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. त्यात अदानी ग्रुप, टाटा प्रोजेक्टसह एस्सेल ग्रुप, कल्पतरू तसेच आर्कीटेक्ट हाफीज कॉन्ट्रक्टर, बीडीपी सिंगापूर अशा विविध क्षेत्रातील कंपन्या आणि उद्योजगांनी सहभाग घेतला. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी या ब्रिटीशकालिन हेरिटेज स्थानकाचा पीपीपी मॉडेल अंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. हे रेल्वे स्थानक 60 वर्षांच्या करारावर खाजगी कंपनीला देण्यात येणार आहे. त्यात विकासकाला किमान 2.54 लाख चौरस मीटर बिल्ट अप एरीया व्यावसायिक विकासासाठी उपलब्ध होणार आहे. या स्थानकांतील हेरीटेज वगळता इतर सर्व इमारतींना भायखळा आणि वाडीबंदर येथे हलविण्यात येणार आहेत. तसेच 1930 साली जशी स्थिती होती तशी निर्माण करून इतर जागेचा खाजगी विकास करण्यात आहे. तेथे रिटेल शॉप, निवासी संकुले उभारण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या