विश्वचषक कुणाच्या हातून देणार, सचिन, क्लार्क की रॉयल फॅमिली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लंडन

वर्ल्ड कप सध्या अंतिम टप्पात पोहचलाय. येत्या 14 जुलै रोजी या स्पर्धेचा चॅम्पियन मिळेल. विजेत्या संघाला कोणत्या पाहुण्यांच्या हातून करंडक प्रदान करण्यात येईल या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. आयसीसीच्या पदाधिकार्‍याकडून यावेळी जेतेपदाचा करंडक देण्यात येणार नाही अशी माहिती आयसीसीकडून यावेळी देण्यात आली. भारतरत्न सचिन तेंडुलकर, 2015 वर्ल्ड चॅम्पियन संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क आणि इंग्लंडमधील रॉयल फॅमिलीचा सदस्य यांच्यापैकी एकाच्या हातून वर्ल्ड कपची ट्रॉफी विजेत्या संघाला देण्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षात अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.