
टीम इंडियाने गुरुवारी श्रीलंकेविरोधात 50 षटकात आठ गडी गमावत 357 धावा केल्या. यात शुभमन गिल याच्या 92, विराट कोहलीच्या 88 आणि श्रेयस अय्यर याच्या 82 धावांचा महत्त्वाचा वाटा आहे. या तिघांचे शतक जरी हुकले असले तरी त्या जोरावर टीम इंडियाने एक वेगळाच विक्रम केला आहे. वर्ल्डकपच्या सामन्यात एकाही फलंदाजाने शतक न करता सर्वात मोठी धावसंख्या करणाऱ्या संघाच्या यादीत टीम इंडियाने पहिले स्थान पटकावले आहे. टीम इंडियाचा हा अनोखा विक्रम आहे.
याआधी या यादीत पाकिस्तान पहिल्या स्थानावर होता. पाकिस्तानने इंग्लंडविरोधात एकाही फलंदाजाने शतक न झळकावता 348 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 2015 च्या विश्वचषकात दुबई विरोधात 341 धावा केलेल्या.

























































