Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा 27 नोव्हेंबरचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष ( ARIES – Saturday, November 27, 2021)
वाहन चालवताना वेग सांभाळा, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या. प्रवासात पैसे सांभाळा.

भाग्य रंग – तपकिरी

वृषभ – (TAURUS – Saturday, November 27, 2021)

आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. प्रयत्न केले की, यश मिळतेच. सुसंवाद साधा.
भाग्य रंग – चॉकलेटी

मिथुन – ( GEMINI Saturday, November 27, 2021)

प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आनंदाची बातमी कळेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

भाग्य रंग – पांढरा

कर्क – (CANCER Saturday, November 27, 2021)

स्वत:च्या आवडीने घर सजावटीसाठी वेळ द्याल, आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन घेऊनच कोणताही निर्णय घ्या.

भाग्य रंग – काळा

सिंह – ( LEO Saturday, November 27, 2021)

गोड बोलून मतभेद दूर कराल. इतरांशी पटवून घ्यावे लागेल. नवीन खरेदीचे नियोजन कराल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

भाग्य रंग – गुलाबी

कन्या (VIRGO Saturday, November 27, 2021)

मनात योजलेल्या नव्या कल्पना सत्यात येतील. घरात प्रसन्नता अनुभवाल. घरातील वयस्कर व्यक्तिंची सेवा करण्याची संधी मिळेल.

भाग्य रंग – मोती

तूळ ( LIBRA Saturday, November 27, 2021)

आपल्या आवडत्या व्यक्तिची भेट होईल. लोकं तुमच्या मताचा आदर करतील. आवडती वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ मिळाल.
भाग्य रंग – खाकी

वृश्चिक ( SCORPIO Saturday, November 27, 2021)

खर्च वाढण्याची शक्यता आहे. सहलीचे बेत आखाल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. नवीन कामं हाती घ्याल.

भाग्य रंग – आकाशी

धनू ( SAGITTARIUS Saturday, November 27, 2021)

स्वत:च्या हौसेमौजेखातर पैसे खर्च कराल. मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायला शिका. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील.

भाग्य रंग – सोनेरी

मकर ( CAPRICORN Saturday, November 27, 2021)
मानसिक स्वास्थ्य लाभेल. एखादी छानशी घटना आज घडण्याची शक्यता आहे. जीवाभावाचे मित्र भेटतील.

भाग्य रंग – पिवळा

कुंभ राशी भविष्य (AQUARIUS Saturday, November 27, 2021)
कौशल्याला वाव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. योगासनं करा उत्साह वाढेल. स्वत:साठी वेळ काढाल.

भाग्य रंग – राखाडी

मीन (PISCES Saturday, November 27, 2021)
आजच्या दिवशी घरात एखादे शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. मनाजोगते ध्येय गाठण्यासाठी मित्र परिवाराच्या मदतीची गरजला लागेल. घरगुती समारंभाचे नियोजन करावे लागेल

भाग्य रंग – जांभळा