Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘13 डिसेंबर’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Tuesday, December 13, 2022)
ताणतणावापासून मुक्त व्हाल. कामाकरिता घरापासून दूर राहावे लागेल. घरगुती कामं कंटाळवाणी वाटू शकतात. सायंकाळी गच्ची किंवा बागेत फिरायला जाल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्याल. घरातील वातावरण आनंददायी असेल. छोट्या सहलीला जाण्यासाठी वेळ काढाल. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Tuesday, December 13, 2022)
देवळात अन्नदान करा. धूम्रपान करणे सोडा. नाविन्यपूर्ण कल्पना सुचेल. कुटुंबियांसोबत वाद घालण्यात वेळ घालवू नका. मित्रांना रिकाम्या वेळेत भेटायला जाल. कुटुंबियांसोबत वाद होतील. जुन्या आठवणीत रमाल. तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. समाजात तुमचे कौतुक होईल.
शुभरंग : नारिंगी

मिथुन (GEMINI – Tuesday, December 13, 2022)
सुंगधी वस्तूंचा वापर करा. घरात भिमसेनी कापराचा धूप करा. कामाच्या ताणामुळे त्रासून जाण्याची शक्यता आहे. सतत हसतमुख राहाल. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार कराल. नव्या व्यक्तिसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील. पुरेशी विश्रांती घ्याल. शांत आणि ताजेतवाने वाटेल.
शुभरंग : हिरवा

कर्क (CANCER – Tuesday, December 13, 2022)
उकडलेले चणे भुकेल्याला खाऊ घाला. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत प्रेमाचे भांडण होण्याची शक्यता आहे. थकवा कमी होईल. घरातील व्यक्तिंसाठी सरप्राईझ डिश बनवा. मनमोकळ्या गप्पांसाठी बऱ्याच दिवसांनी वेळ मिळेल. केसात अबोलीचा गजरा माळा. मन प्रसन्न राहिल, अशा गोष्टी करा.
शुभरंग : नारिंगी

सिंह (LEO – Tuesday, December 13, 2022)
प्रकृतीची काळजी घ्या. गरजेच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. सतत फोन गप्पा मारण्यात वेळ वाया घालवू नका. कार्यालयीन कामकाजाकडे थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. प्रिय व्यक्तिच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आवडती कला साध्य करण्यासाठी मेहनत घ्याल.
शुभरंग : निळा

कन्या (VIRGO – Tuesday, December 13, 2022)
सकाळी सूर्यनमस्कार घाला. भावनांवर नियंत्रण ठेवा. मनातील भीती शक्य तितक्या लवकर काढून टाका. अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षावर होईल. कुटुंबासोबत बसून गप्पा माराल. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा. विष्णुमंदिरात गहू, दलिया, गूळ, मसूर, कुंकू, वस्त्र इत्यादी पदार्थांचे दान करू शकता.
शुभरंग : आकाशी

तूळ (TULA- Tuesday, December 13, 2022)
आरोग्य चांगले राहिल. लोकं तुमचे कौतुक करतील. हातात चांदीचं कडं घाला. अनावश्यक काम करण्यात वेळ वाया घालवू नका. विठ्ठल मंदिरात जा. भविष्याचे नियोजन करा. आजचा दिवस शांत, निवांतपणे घालवाल. जोडीदार तुमच्या मनोकामना पूर्ण करेल. घरी अनपेक्षित पाहुणे येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : जांभळा

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, December 13, 2022)
मोहरीचे तेल बेंबीला लावा. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. सकाळी चालायला जा. प्रतिष्ठेत वाढ होईल. आर्थिक फायदा होईल. ग्रहमान चांगले राहिल. नवीन पर्सची खरेदी कराल. पुरेशी विश्रांती घ्या. मानसिक ताण घेऊ नका. काटकसरीने पैसे खर्च कराल. जुन्या आठवणी ताज्या होतील.
शुभरंग : पांढरा

धनु (SAGITTARIUS – Tuesday, December 13, 2022)
शंकराला बेलफळ वाहा. अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पडेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत कराल. प्रत्येक कृती प्रेमापोटी असू देत. घरातील वरिष्ठ मार्गदर्शन करतील. प्रिय व्यक्तिला पर्याप्त वेळ द्याल. दत्त महाराजांचे दर्शन घ्या. मौजमजा कमी करायला मिळेल. कामाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. कामातला आनंद मिळवाल. हाताखालचे लोक सहकार्य करतील.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Tuesday, December 13, 2022)
घरात लोभाण धूप करा. दिवसभरात विश्रांतीसाठी वेळ द्याल. विचारपूर्वक निर्णय घ्याल. कुटुंबासाठी आनंददायी बातमी कळेल. घरातील जुन्या सामान बदलण्याचा निर्णय घ्याल. मारुतीच्या मंदिरात जा. तोंडाळ माणसाला जास्त किंमत देऊ नका. योग्य व्यक्तिकडे मन मोकळे कराल. घरी पोस्टाने पत्र येईल.
शुभरंग : मोरपिसी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, December 13, 2022)
चंद्र प्रकाशात 15 ते 20 मिनिटे बसा. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्याल. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. सगळ्यांशी प्रेमाने वागा. एकांताचा आनंद मिळेल. जोडीदारावर वैतागू नका. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा. सायंकाळी मौजमजा करण्यात वेळ जाईल. शनी स्तोत्र वाचा.
शुभरंग : नारिंगी

मीन (PISCES – Tuesday, December 13, 2022)
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण येण्याची शक्यता आहे. दुर्गादेवी मंदिरात जा. रिकाम्या वेळेचा उपयोग करा. जुन्या मित्रांना भेटण्याचा प्लान आखाल. ति-हाईत व्यक्ती तुमच्यात आणि जोडीदारामध्ये भांडण लावून देण्याची शक्यता आहे. तणावमुक्त राहाल. कुटुंबियांसोबत सहलीला जाल. मानसिक शांतता मिळेल.
शुभरंग : चॉकलेटी