
मेष (ARIES – Wednesday, October 26, 2022)
वाहत्या पाण्यात तांब्याचा शिक्का प्रवाहित करा. प्रेम प्रकरणात यश मिळेल. कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरजही समजून घ्या. विमाविषयक कामकाजाकडे लक्ष द्या. जोडीदाराला प्रेमाने बोलणे शिकवावे लागेल. चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन नाती दीर्घकाळ टिकाणारी असतील. प्रिय व्यक्तिला दुरावू नका. मौजमजा कराविशी वाटेल.
शुभरंग : सोनेरी
वृषभ (TAURUS – Wednesday, October 26, 2022)
सातत्याने श्रम करावे लागतील. मिळालेला रिकामा वेळ आवडती कामे करण्यात घालवाल. स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती येईल. जिममध्ये जावे असे वाटू लागेल खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. समाजातून कौतुकाची थाप मिळेल. विष्णुसहस्त्रनामाचे वाचन करा. कोणाविषयीही पूर्वग्रह ठेवू नका. सायंकाळी घरात धूप दाखवा. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. क्षमा करणे हा सद्गुण आहे.
शुभरंग : राखाडी
मिथुन (GEMINI – Wednesday, October 26, 2022)
गणपतीला जास्वंदीचं फूल आणि दूर्वा वाहा. आजचा दिवस स्फूर्तिदायी आहे. ज्येष्ठ व्यक्तिंचे आशीर्वाद लाभतील. मेहनत करण्याची तयारी ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वाहन सावधपणे चालवा. प्रिय व्यक्तिला समजून घ्यावे लागेल. घरातील लहान मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. देवाळात प्रसाद वाटा. स्वत:साठी वेळ काढावा लागेल.
शुभरंग : काळा
कर्क (CANCER – Wednesday, October 26, 2022)
तेलकट, तिखट आहार टाळा. नवीन आर्थिक योजनात भाग घ्याल. नातेवाईकाकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळेल. आजचा दिवस कुटुंबासाठी आनंदाचा असेल. बालपणीच्या आठवणीत रमाल. नातेसंबंधात दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तिशी उग्र वागू नका. देवीस्तोत्र वाचा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गणेश मंदिरात भगव्या झेंड्याचे दान करा. मित्रमैत्रिणींचा सहवास मिळेल.
शुभरंग : केशरी
सिंह (LEO – Wednesday, October 26, 2022)
प्रियकर किंवा प्रेयसीला चांदीची अंगठी भेट द्या. प्रेम वाढेल. ताणतणावापासून दूर राहण्याकरिता जीवनशैलीत बदल करावा लागेल. पैशाची आवश्यकता भासू शकते. पैसे बचतीच्या योजनांचा लाभ घ्या. व्यस्त दिनचर्यमुळे जोडीदाराला वेळ देता येणार नाही. प्रत्येक काम उद्यावर ढकलू नका. उदार राहा. वेळेच्या आधी सर्व कामे पूर्ण होतील असे पाहा. स्वत:साठी वेळ काढा. रामरक्षा स्तोत्र वाचा. सायंकाळ आनंदात जाईल.
शुभरंग : खाकी
कन्या (VIRGO – Wednesday, October 26, 2022)
आजचा दिवस उत्तम आहे. विष्णु सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करा. विष्णु मंदिरात चंदन अर्पण करा. कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न कराल. शिक्षणात एकाग्रता ठेवा. प्रसन्न राहा. घरातील वातावरण सकारात्मक राहील. कोणावरही चिडचिड करू नका. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. अनावश्यक बोलू नका. घरीचे अनपेक्षित पाहुणे येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : सोनेरी
तूळ (TULA- Wednesday, October 26, 2022)
सुर्याचा जप करा. भूतकाळातील गुंतवणूक उपयोगी पडेल. कुटुंबियांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करा. दृष्टिकोनात बदल होण्याची शक्यता आहे. अनुभवी व्यक्तिला तुमची समस्या सांगाल. आरोग्याची काळजी घ्या. मिळालेला रिकामा वेळ आवडते संगीत ऐकण्यात किंवा पुस्तके वाचण्यात घालवाल. चांगल्या संधी साधून येतील. एकांतात वेळ घालवणे आवडू लागेल. शिवमंदिरात जा. आवडत्या व्यक्तिची भेट होईल.
शुभरंग : पिवळा
वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, October 26, 2022)
गरजूला लोखंडाच्या भांड्याचे दान करा. कुटुंबियांना आनंदात ठेवा. विनयशील वागण्याने कौतुक होईल. लोकं तुमची स्तुती करतील. व्यापारात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचारांचा पाठिंवा देणाऱ्या मित्रांबरोबर राहा. प्रवास फायदेशीर ठरेल. प्रेम आणि चविष्ट पदार्थ या दोन्हींची आज सांगड घालाल. अनावश्यक कामे करायला जाऊ नका. मनाजोगी खरेदी कराल. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळतील.
शुभरंग : नारिंगी
धनु (SAGITTARIUS – Wednesday, October 26, 2022)
घरातील माशांना खाऊ घाला. आहाराचे पथ्य पाळा. नियमित व्यायाम करा. अचानक पैशाची आवश्यकता भासेल. जोडीदारासोबत चांगला संवाद साधाल. कामाचा हुरुप वाढेल. सायंकाळी बागेत फिरायला जावेसे वाटेल. जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षणाचा आनंद घ्याल. फुलदाणीत गुलाबाची फुले ठेवा. आराध्य देवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : पोपटी
मकर (CAPRICORN – Wednesday, October 26, 2022)
प्रकृती चांगली राहिल. शिव मंदिरात जाऊन अभिषेक घाला. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. स्पर्धात्मक परीक्षेला शांत मनाने सामोरे जा. आराध्य देवतेला प्रार्थना करा. आळस घालवण्यासाठी प्रयत्न कराल. थकल्यामुळे विश्रांती घ्यावीशी वाटेल. आईवडिलांसाठी वेळ काढा. अति बोलणे टाळा. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सहवासात राहाल. आवडता पोषाख परिधान करा.
शुभरंग : राखाडी
कुंभ (AQUARIUS – Wednesday, October 26, 2022)
पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. अतिउत्साह चिंतेत टाकू शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवा. आर्थिक समस्या उभी ठाकू शकते. वेळीच सावध व्हा. जोडीदाराशी क्षणिक वाद होण्याची शक्यता आहे. दिव्यांगाना भोजन द्या. पिवळा रुमाल खिशात ठेवा. करियरमध्ये यश मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. सकाळी सूर्यदेवतेचे दर्शन घ्या. विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठ कौतुक करतील. शिक्षणात लक्ष द्या. वेळ पाळावी लागेल.
शुभरंग : गुलाबी
मीन (PISCES – Wednesday, October 26, 2022)
तांब्याच्या चैनमध्ये गुंफलेले रुद्राक्ष गळ्यात घाला. मित्र आपल्या मनमोकळ्या स्वभावाची परीक्षा घेतील. इतरांचे लक्ष वेधून घ्याल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन आखाल. कामाचे वेळापत्रक धावपळीचे असेल. मनाजोगी घटना घडेल. आवडत्या व्यक्तिला भेटवस्तू द्या. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. खाण्याची इच्छा होत असलेला पदार्थ अनपेक्षितपणे समोर येईल. घरी सत्यनारायण पूजेसारखे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : चंदेरी


























































