
मेष (ARIES – Friday, February 18, 2022)
खूप विचार करू नका. मानसिक शांतातेवर परिणाम होऊ शकतो. आजचा दिवस नवे मित्र जोडण्याचा आहे. नवे घर घ्याल. नवीन काम हाती घ्याल. नोकरी-व्यापारात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. एखाद्या गोड बातमीमुळे आयुष्याला कलाटणी मिळू शकते.
शुभरंग: हिरवा
वृषभ (TAURUS – Friday, February 18, 2022)
रखडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीत मनाप्रमाणे बदल होऊ शकतात. पैशाचा अपव्यय टाळा. बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग अचानक ठरवाल. प्रिय व्यक्तिसोबत प्रेमसंबंध दृढ होतील. मनासारखे काम पूर्ण होईल. आजचा दिवस उत्साहात घालवाल.
शुभरंग: काळा
मिथुन (GEMINI – Friday, February 18, 2022)
आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात घालवाल. सहकुटुंब समाजकार्याचा आनंद घ्याल. तुमच्या मदतीला आज तुमची एक खास मैत्रिण येण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसोबत असलेले मतभेद मिटतील. समस्येवर इतरांचा सल्ला घ्यावा लागेल.
शुभरंग: मोरपिसी
कर्क (CANCER – Friday, February 18, 2022)
गुप्तचिंता मिटण्याची शक्यता आहे. काळजीचे सावट दूर होईल. आजचा दिवस जोडीदार तुम्हाला खूश करण्याचा आहे. बचतीत वाढ होईल. प्रिय व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक सेवेसाठी वेळ द्या. प्रवास योग आहेत. तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा होईल.
शुभरंग: सोनेरी
सिंह (LEO – Friday, February 18, 2022)
चिकाटीने हाती घेतलेले काम पूर्ण करा. मेहनतीचे फळ मिळेल. शिव आराधना करा. मंदिरात जा. वाहन चालवताना काळजी घ्या. स्वास्थ्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च करू नका. स्वत:साठी वेळ काढावा लागेल.
शुभरंग: आकाशी
कन्या (VIRGO – Friday, February 18, 2022)
मानसिक समाधान मिळेल. मनावर काळजीचे सावट असले तरी दडपण दूर होईल. जवळचा प्रवास कराल. आर्थिक गुंतवणूक करताना लाभाचा विचार करून, योग्या मार्गदर्शन घेऊनच पुढचे निर्णय घ्या. प्रवासामुळे कामे साध्य होतील. आळशीपणा वाढू शकतो, लक्ष ठेवा.
शुभरंग: सोनेरी
तूळ (LIBRA – Friday, February 18, 2022)
सध्याचा काळ नव्या व्यवसायाला अनुकूल आहे. स्वच्छता आणि शिस्त यामुळे मिळालेल्या संधीचे सोने कराल. कोणाशीही वाद घालण्यात वेळ घालवू नका. जबाबदाऱ्या वाढतील. उत्साह वाढेल. योग्यतेनुसार ज्ञानाचा वापर करा.
शुभरंग: खाकी
वृश्चिक ( SCORPIO – Friday, February 18, 2022)
कामाचे कौतुक होईल, पण धीर धरावा लागेल, वरिष्ठांसोबत संबंध सुधारतील. तब्येत थोडी नरम-गरम राहील. काळजी घ्या. नवे सहकारी भेटतील. आत्मविश्वास वाढेल. जुन्या मित्रांची पुन्हा भेट होईल. चांगली बातमी कानी येईल.
शुभरंग: राखाडी
धनु (SAGITTARIUS – Friday, February 18, 2022)
आज कामात मन एकाग्र करायला त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कष्ट पडू शकतात. घरातील टेरेसवर जाऊन मोकळ्या आकाशाचा आनंद घ्या. आज बराच रिकामा वेळ मिळेल. मनाजोग्या गोष्टी करू शकाल.
शुभरंग: चिंतामणी
मकर ( CAPRICORN – Friday, February 18, 2022)
मन:शांती अनुभवाल. पाहुण्यांचे आगत-स्वागत करावे लागेल. नातेसंबंध जपा. प्रिय व्यक्तिची अचानक भेट होईल. अपेक्षित यश मिळेल. तुमच्या आराध्य देवतेची उपासना करा. कुटुंबियांसोबतचे मतभेद मिटतील. आवडीचा पदार्थ अनपेक्षितपणे खायला मिळेल.
शुभरंग: नारिंगी
कुंभ (AQUARIUS -Friday, February 18, 2022)
वाहन चालवताना काळजी घ्या. समाजात योग्य तो मान मिळेल. नव्या कामाला सुरुवात करू शकता. क्रोधाने वागू नका. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. साहस, स्पष्टवक्तेपणा, शिस्त हे आपल्या राशींचे मुख्य गुण आहेत. त्याचा कौशल्याने वापर योग्य त्या ठिकाणी केल्यास यश मिळू शकते. नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे.
शुभरंग: पांढरा
मीन (PISCES – Friday, February 18, 2022)
अल्प प्रयत्नांमुळेही यश मिळून जाईल. सहकारी वर्गाची मदत लाभेल. आपल्यावर सोपवलेली कामगिरी यशस्वीरित्या पार पाडाल. मानसिक दडपण कमी होईल. उत्साह वाढेल.
शुभरंग: हिरवा




























































