शिवसेनेच्या प्रयत्नामुळे नवघरवासीयांच्या डोक्यावर लोंबकळणारी मृत्युची तार अखेर दूर

20

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे गेले कित्येक वर्षे नवघरवासीयांच्या डोक्यावर लोंबकळत असलेली मृत्यूची तार अखेर हटविण्यात आली. गेले कित्येक वर्षांपासून नवघर गावातून महावितरणची उच्च दाबाची वाहिनी गेली होती. या वीज वाहिनीमुळे अनेकांना अपघात होऊन जीव गमवावा लागला होता तर कित्येक जण जखमी झाले होते. उरण तालुक्यात वीज सुरू झाल्यापासून ही वाहिनी नवघर वासीयांची मृत्युघंटा बांधून लोंबकळत होती.

गेली अनेक वर्षे ही वाहिनी गावातून काढून बाहेरून घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी करत होते. मात्र ही वाहिनी हलविली गेली नव्हती. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर आणि त्यांच्या विजय विकास सामाजिक संस्थेने या बाबत जोरदार पाठपुरावा केल्यानंतर नुकतेच ही वीज वाहिनी गावाबाहेरून काढण्यात आली. आमदार मनोहर भोईर यांनी या कामाचे उदघाटन केले. यावेळेला जि.प. सदस्य विजय भोईर, विकास भोईर, सरपंच सौ. चौगूले मॅडम, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामाबद्दल ग्रामस्थांनी शिवसेना आणि विजय विकास सामाजिक संस्थेचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या