बिहारमध्ये मेंदूज्वराने 68 बालकांचा मृत्यू

57

सामना ऑनलाईन। पाटणा

बिहारमध्ये मेंदूज्वराने थैमान घातले असून मुझफ्फरपूर मध्ये या आजाराने दगावणाऱ्यांच्या बालकांची संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी सकाळपर्यंत मेंदूज्वराने मृत्यूमुखी पडलेल्या बालकांचा आकडा 68 पर्यंत पोहोचला. यातील 55 बालकांचा मृत्यू श्री कृष्णा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मध्ये झाला असून इतर 11 बालके केजरीवाल रुग्णालयात उपचार घेताना दगावली आहेत. लिची खाल्ल्यानंतरच मुलांना हा ताप आल्याचा दावा केला जात आहे.

गेल्या 24 दिवसात या मेंदूज्वराने बिहारमध्ये हाहाकार उडवला आहे. विशेष करून मुजफ्फरपूर आणि त्याला लागून असलेल्या परिसरात या आजाराने ग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. अद्यापपर्यंत यात 68 बालकांचा मृत्यू झाला आहे. या आजाराच्या विळख्यात प्रामुख्याने पंधरा वर्षाखालची मुलचं सापडली असून यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक ते सात वर्षांपर्यतच्या मुलांचा आकडा सर्वाधिक आहे. ताप,उलट्या जुलाब,बेशुद्ध पडणे आणि थकवा जाणवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत असे डॉक्टरांनी सांगितले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या